Pages

Tuesday, 26 November 2013

बसस्टँडची नोंद गुगल मॅपवर

गुगल मॅप किंवा अन्य मॅपींग सॉफ्टवेअरवर राज्यातील एसटी बसस्टँडची माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे परदेशी पर्यटकांना एसटीच्या पिकअप पॉइंट आणि एसटी बसस्टँडची माहिती मिळणे अवघड जाते. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळ आगाराच्या सर्व बसस्टँडची माहिती गुगल मॅपवर नियमानुसार अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या या माहितीचा उपयोग हा सांख्यिकी विभागाकडून केला जात आहे. आगामी काळात वाहतूक व्यवस्‍था सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. 

एसटी महामंडळाचा कारभार व्यवस्‍थापकीय संचालक विकास खारगे यांनी संभाळल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगाराचे कामकाज सुधारावे यासाठी थेट आगार व्यवस्‍थापक, विभागीय नियंत्रक आणि विभागीय व्यवस्‍थापक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यास सुरुवात केली. यामुळे समांतर वाहतूक, आणि विभागीय पातळीवरील विविध समस्या सोडविण्यात यश आले. एसटी महामंडळाचा कारभार अधिक चांगला व्हावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना (एनआरएचएम) विविध स्‍थळांची नोंद करून ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी खारगे यांनी काम केले आहे. एसटीचे राज्यभरात विविध ठिकाणी बसस्टँड आहेत. या बसस्टँडची माहिती गुगल मॅप किंवा अन्य मॅपवर अपडेट केली जाणार आहे. अक्षांश आणि रेखांशांच्या अंतर्गत सर्व बसस्टँडची नोंद केली जात आहे. 

या संपूर्ण माहितीची नोंद घेण्याचे काम एका खासगी संस्‍थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सध्या मॅपींग अपडेट करण्याचे काम सांख्यिकी विभागासाठी केले जात आहे. मात्र, आगामी काळात या माहितीचा उपयोग समांतर वाहतूक किती आणि कोणत्या बस स्‍थानकातून केली जाते, याची माहिती संकलित केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment