Pages

Wednesday, 4 December 2013

हॅशटॅग वापरण्यासाठी खास टिप्स

फेसबुकमध्येही सुरू झालेल्या हॅशटॅगच्या सुविधेचा वापरअनेकांनी सुरू केला आहे इतरही अनेक साइटवरही हीसुविधा उपलब्ध आहे मात्र हॅशटॅग नेमका कशासाठीवापरायचा हे अनेकांना माहिती नसते हॅशटॅगच्यावापराबाबतच्या या काही खास टिप्स ... 

हॅशटॅगमध्ये काय 

हॅशटॅग म्हणजे हॅश (#) चिन्हापुढे सलग स्पेस न देतालिहिलेला शब्द किंवा शब्दसमूह हा हॅशटॅग एकक्लिकेबल लिंक तयार करतो ज्यामार्फत आपण तो शब्दहॅश चिन्हाने टॅग केलेल्या सर्व पोस्ट पाहू शकता आपणजेव्हा हॅशटॅगवर क्लिक करतो तेव्हा एक वेगळे पेज (लिंक ओपन होते यामध्ये त्या विषयावर लोकांनी कायपोस्ट केल्या आहेत हे आपल्याला पाहता येते एखादा शब्द हॅशटॅगमध्ये जास्त वापरला गेल्यास तो त्यासाइटवरील ट्रेण्ड बनतो 

हॅशटॅगमध्ये काय असावे 

हॅशटॅगमध्ये लोअर केस आणि अप्पर केस किंवा अंकांचा पहिले अक्षर वगळता समावेश असतो स्पेशलकॅरेक्टर्सना हॅशटॅगमध्ये ग्राह्य धरले जात नाही स्पेशल कॅरेक्टर वापरल्यास हॅशटॅग संपतो उदा जर #three$असा हॅशटॅग वापरला तर फक्त #three एवढाच शब्द ग्राह्य धरला जातो त्यामुळे #three$ ऐवजी#threedollar असा हॅशटॅग वापरावा 

जास्त हॅशटॅग वापरू नका 

तुम्हाला कितीही महत्त्वाची माहिती सांगायची असली तरी कमीत कमी हॅशटॅग वापरण्याचा प्रयत्न करा काहीसाइट्सनी स्वत च हॅशटॅगच्या वापरावर बंधने घातली आहेत उदा इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त ३० हॅशटॅगवापरता येतात मात्र इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त ६ हॅशटॅग वापरलेले चांगले तर फेसबुक ट्विटर ,पिनट्रेस टम्बलरसारख्या साइट्सवर जास्तीत जास्त दोन ते तीन हॅशटॅग वापरल्यास पोस्ट शॉर्ट अॅण्ड स्विटदिसते 

हॅशटॅग कसा निवडावा 

या आधी कोणता हॅशटॅग वापरण्यात आला आहे यावरही हॅशटॅगचा वापर अवलंबून असतो आधीपासूनट्रेण्डमध्ये असणारा हॅशटॅग वापरल्यास त्या हॅशटॅगशी संबंधित इतर चर्चाही एका क्लिकवर पाहता येऊ शकतातत्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात माहितीशी तुमचा हॅशटॅग असेल याची विशेष काळजी घेतल्यास तुमचे मतअनेकांपर्यंत पोहचते जे हॅशटॅग ट्रेण्डमध्ये नाहीत किंवा ज्यांचा तुमच्या विषयाशी थेट संबंध नाही असे हॅशटॅगशक्यतो वापरू नयेत सर्चबॉक्समध्ये तुम्हाला हवा असणारा हॅशटॅग सर्च करून तो किती पॉप्युलर आहे हेतपासून पाहता येते हॅशटॅग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला पाहिजे हे लक्षात घेऊन हॅशटॅगची निवडकरा 

सर्व प्लॅटफॉर्मवर सातत्य राखा 

हॅशटॅग वापरण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे सर्वच सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकाच प्रकारचे हॅशटॅगवापरणे तुम्हाला एखादे कॅम्पेन करायचे असेल तर ट्विटर फेसबुक इन्स्टाग्रामवर एकच हॅशटॅग वापरणेअपेक्षित आहे उदा . #thankyousachin हा हॅशटॅग सर्वच साइट्सवर वापरल्यास हा हॅशटॅग असणाऱ्या सर्वचपोस्ट एका क्लिकवर दिसतील यामुळे तुम्हाला स्वत ला माहिती शोधणे तसेच तुमच्या फॉलोअर्सना इतरसाइटवर केलेल्या पोस्टशी संदर्भ लावणे सोपे होते .

1 comment: