Pages

Wednesday, 4 December 2013

वादळाचं नाव ठरतं कसं?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पायलिन 'वादळ सध्या चर्चेत आहे. या वादळाला पायलिन हे नाव थायलंडनं दिलं आहे. थाई भाषेत नीलम या रत्नालापायलिन असं म्हणतात. ही वादळांची नावं ठरवण्याची एक पद्धत आहे. आशियाई देशांमध्ये येणाऱ्या वादळांना विविध देशांनी नावं दिली आहेत. 

आशियाई देशांमध्ये येणाऱ्या वादळांना विशिष्ट नावं देण्याची प्रथा २००४पासून सुरू करण्यात आली. त्यावेळी झालेल्या बैठकीत प्रत्येक देशानं ठरावीक नाव देण्याचं ठरलं. त्यातून प्रत्येकी ३२ नावांचा एक याप्रमाणे दोन संच तयार करण्यात आले. पायलिन हे संचामधील शेवटचं म्हणजेच ३२वं नाव आहे. याचा अर्थ २००४पासून आलेलं पायलिन हे ३२वं वादळ ठरलं आहे. भारतीय उपखंडात १७ मे २०१३ रोजी आलेल्या वादळाचं नाव श्रीलंकेतर्फे महासेन असं ठेवण्यात आलं होतं. तेथील एका स्थानिक राजाच्या नावावरून हे नाव निर्धारित करण्यात आलं होतं. या नावाला काही बौद्धधर्मीयांनी विरोधही दर्शवला होता. १७ मे २०१३ रोजी आलेल्या महासेन नं बांगलादेशमध्ये कहर माजवला होता. 

नवी दिल्ली येथील द स्पेशियालाइज्ड मेटेरॉलॉजिकल सेंटर नं भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, आणि थायलंड यांनी सुचविलेली ६४ नावं वादळासाठी निर्धारित केली. या नावांमधूनच अरबी समुद्र अणि बंगालच्या उपसागरातील वादळांचं नामकरण करण्यात येते. वादळाच्या येण्याच्या शक्यतेवरून क्रमाक्रमानं संबंधित देशानं सुचवलेलं नाव वादळाला देण्यात येतं. 

लवकरच हेलेन घोंघावणार 
भारतीय उपखंडात पायलिन नंतर येणाऱ्या वादळाचं नाव हेलेन असं निश्चित करण्यात आले आहे. हे नाव बांगलादेशनं ठरवले आहे. 

No comments:

Post a Comment