Pages

Monday 26 August 2013

इंटरनेट, भारत आणि जग

इंटरनेट जगतात सर्वात जास्त युझर्स हे अमेरिकेचे आहेत. दोन नंबर चीनचा तर तिसरा नंबर भारताचा लागतो.
जपानला मागे टाकून भारतानं तिसरा क्रमांक पटकावला आहे. इंटरनेट जगतातील हालचाली टिपणारी संस्था कॉमस्कोरने ही आकडेवारी दिली आहे.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांचं वय इतर विकसनशील देशांच्या तुलनेत सरासरीने फारच कमी आहे. कॉमस्कोरने आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे.
यात '2013 इंडिया डिजिटल फ्यूचर इन फोकस'ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात घरी आणि ऑफिसात एकूण सात कोटी 39 लाख लोक इंटरनेट वापरतात.

कॉमस्कोरने दिलेल्या रिपोर्टमध्ये मोबाईल आणि टॅबलेट यूझर्सची एकूण संख्या 14 टक्के सांगण्यात आली आहे.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्येत 75 टक्के युझर्सचं वय 35 पेक्षा कमी आहे. भारतात 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे युझर्स आहेत, तर महिलांमध्ये 35 ते 44 च्या वयोगटात सर्वात जास्त महिला इंटरनेट वापरतात.

भारतात इंटरनेट वापरकर्ते जवळपास 25 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्च करतात, एवढाच वेळ ते ई-मेलसाठीही वापरतात.भारतात ब्लॉगर्सची संख्या वाढली असल्याचंही कॉमस्कोरने केलेल्या रिसर्चमध्ये दिसून आलं आहे.

भारतात मागील वर्षभरात ब्लॉगर्सची संख्या 48 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर ब्लॉगिंग साईटवर येणाऱ्या वाचकांची संख्या 3 कोटी 60 लाख झाली आहे.
यातील 26 टक्के युझर्स ब्लॉगिंग साईटवर स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या माध्यमातून येतात. ऑनलाईन व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या भारतात वेगाने वाढतेय.

कॉमस्कोरने दिलेल्या रिपोर्टनुसार मागील वर्षी 40 लाख लोकांनी ऑनलाईन व्हिडीओ पाहिले. मागील रेकॉर्डपेक्षा यात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.