Pages

Monday, 25 November 2013

समजून उमजून फुलवा नातं


मुलांकडून असलेल्या मुलींच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा, जास्त पगाराची नोकरी असणारी बायको असूनही मुलांचा आड येणारा 'अहं'... यांसारख्या लग्नासंदर्भातल्या बाबींविषयी लग्नापूर्वीच नेमकं काय लक्षात घ्यायला हवं? याविषयी...

शिक्षण संपवून मुलगा नोकरीत धंद्यात स्थिरस्थावर झाला, की त्याच्या आई-वडिलांची (आईची जरा जास्तच) आणि अर्थातच इतरांची त्याच्या लग्नाची घाई सुरू होते. मुलानं स्वतःचं लग्न जमवलं नसेल, तर कशी मुलगी हवी? नोकरी करणारी हवी, की नको? ती एकत्र कुटुंबात राहील का? हल्लीच्या मुली, त्यांचं वागणं-बोलणं, कपडे, टीव्हीतील सुना अशा एक ना अनेक विषयांवर घरात चर्चा सुरू होते.

काळाची गरज...



पूर्वीच्या काळी मुलाचं लग्न ही तशी सोपी गोष्ट होती. (लग्नाच्या बाजारात मुलाचं पारडं नेहमीच जड असायचं) नवरा-बायकोच्या संसारातल्या भूमिका निश्चित होत्या. नवऱ्याने नोकरी-धंदा करून अर्थार्जन करून घरीच, कुटुंबाची सर्व जबाबदारी संभाळायची आणि बायकोने घर-संसार, मुलं, पाहुणे वगैरे गोष्टी बघायच्या; पण आता बदलत्या काळात या भूमिका धूसर झाल्या आहेत. दोघांनी नोकरी करून घराची, कुटुंबाची जबाबदारी उचलणं, ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे याला सुसंगत अशी पुरुषांची मानसिकता बदलणंसुद्धा गरजेचं झालं आहे.

हल्ली मुलीसुद्धा उच्चशिक्षित, कर्तबगार, महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याकडून विविध कल्पना, इच्छा, अपेक्षा, स्वप्ने असतात. त्यांची अर्थातच फक्त घरी राहून घरकाम करणं, मुलं संभाळणं या सगळ्याची तयारी नसते आणि तिथंच तणावाला सुरुवात होते. त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे मुला-मुलींचं वाढतं वय आणि दोघांच्याही अवास्तव अपेक्षा त्यामुळे लग्न ठरवणं आणि टिकवणं यात अडचणी येताना दिसतात.

अपेक्षा मुलींच्या...

लग्न ठरवताना मुलींना फक्त इंजिनीरिंग, डॉक्टर, सीए, आयटी झालेलीच मुलं हवी असतात. स्वतःचं घर, गाडी, इंटरनॅशनल कंपनीतली नोकरी अशाच मुलांना मुली प्राधान्य देतात. बीए, बीकॉमसारखं शिक्षण घेतलेल्या मुलांना लग्नासाठी मुली आणि त्यांच्या पालकांकडून फारशी पसंती दिली जात नाही. स्वतःचं घर, गाडी घेईपर्यंत मुलांचं वय वाढत जातं; पण अशा तिशीच्या काकांशी लग्न करायची मुलींची तयारी नसते. त्यामुळे तर हल्ली लग्नाच्या बाबतीत मुलांची फारच कुचंबणा होताना दिसते. या सगळ्याबरोबरच मुलांना घरकाम, स्वयंपाक, मुलं संभाळणं या सर्व गोष्टी येणं आवश्यक समजलं जातं, तर दुसऱ्या बाजूला बायकोने उच्च शिक्षण घेतलेलं असायला हवं, नोकरी करायला हवी; पण त्याचबरोबर घर, मुलं, पै-पाहुणे, स्वयंपाक, घरकाम, बाहेरची कामं हे सर्व बायकोनंच केलं पाहिजे. (कारण ते बायकोनेच करायचं असतं.) अशी मुलांची मानसिकता दिसून येते. या सगळ्यामुळेच दोघांच्याही मनात लग्नाबद्दल गोंधळ दिसून येतो.

मुलांसाठीही विवाहपूर्व समुपदेशन

पत्रिका, ज्योतिषी यांच्याएवढंच महत्त्व विवाहपूर्व समुपदेशनाला (Pre marital counsclling) आलं आहे; पण बरेचदा हे सर्व मुलींसाठीच असतं, असा असज दिसून येतो;

कारण लग्नानंतर तडजोडी फक्त मुलींनाच कराव्या लागतात. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. तडजोडी या मुला-मुलींना, दोघांनाही कराव्या लागणार आहेत. विवाहपूर्व समुपदेशनामुळे आपल्याला स्वतःच्या तसंच आपल्या जोडीदाराच्या, आयुष्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजायला मदत होते. जोडीदाराची निवड करताना दोघांचं शिक्षण, नोकरीचं स्वरूप, कामाच्या वेळा, ठिकाण, पगार, भविष्य यांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. अजूनही नवऱ्याचा पगार बायकोपेक्षा जास्त असणं आवश्यक वाटतं. नाहीतर त्यात अहंकार डोकावण्याची आणि मध्ये येण्याची शक्यता असते.

अपेक्षांचा विचार लग्नापूर्वीच...

रोहित आणि रचनाचा प्रेमविवाह. रोहित मेकॅनिकल इंजिनीअर, तर रचना बीएससी; पण एका आयटी कंपनीत नोकरीला. हळूहळू तिच्या कामातली प्रगती आणि सतत नवनवीन शिकण्याच्या वृत्तीमुळे तिला लवकरच चांगल्या आयटी कंपनीत नोकरी मिळाली. वरचेवर युरोप, अमेरिका वाऱ्या सुरू झाल्या. रोहितच्या पगारापेक्षा तिचा पगार वाढला. रचनाच्या वागण्यात त्यामुळे फारसा फरक पडला नाही; पण रोहितला खूप असुरक्षित आणि कमीपणा वाटायला लागला. तेच तेच कंटाळवाणं काम, बेताचा पगार यामुळे त्याची चिडचिड सुरू झाली. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं.

अजूनही बरेचदा मुलांना बायकोने त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळवणं, पुढे जाणं सहन होत नाही. अशा वेळी खरंतर गरज असते, ती मनाचा मोठेपणा दाखवायची. Behind every successful woman there is a man असं का असू नये ‌बरं? हल्लीच्या नोकरीच्या संधी आणि बदलत्या जीवनशैलीत मुलांनी लग्नाचा विचार करण्याआधी या सर्वच गोष्टींचा विचार अवश्य करावा. त्याबद्दल आपल्या जोडीदाराशी सविस्तर चर्चा करावी. स्वयंपाक, घरकाम, साफसफाई, खरेदी, मुलं, शाळा, अभ्यास या सर्वांची जबाबदारी मुलांनीसुद्धा उचलायला हवी.

अडचणीतून मार्ग असतोच

सुयश आणि नेहा दोघेही नोकरी करणारे; पण कामाच्या वेळा वेगवेगळ्या. नेहाच्या कामाची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी कितीही वाजेपर्यंत, तर सुयश संध्याकाळी पाच ते रात्री अडीचपर्यंत कामात बुडालेला. लग्नानंतर थोडे दिवस कशीबशी त्यांनी तडजोड केली; पण घरकाम, स्वयंपाक, स्वच्छता, बाहेरची कामं कोणी करायची, यावरून खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे नेहाने नोकरी सोडून टीपिकल बायकोप्रमाणे घरचं सर्व करावं, असं सुयशला वाटायला लागलं. सासूला तीन मंगळागौरीची पूजा, गौरी-गणपती वगैरे करावं, असं वाटलं; पण नेहाला वेळ होता कुठे?

आता यातून मार्ग तरी कसा काढणार? म्हणजे तिने नोकरी सोडून घरी बसायचं? तर तिची तयारी नव्हती. मग सुयशनेच सकाळची थोडी घरातली कामं केली तर? 'अमेरिकेत मुलगा छान पोळ्या करतो, कुकर लावतो' म्हणणाऱ्या आईला भारतात मुलाने घरकाम करणं कमीपणाचं का वाटावं, बरं?

अशावेळी दोघांनी आणि अर्थातच घरच्या लोकांनी बोलून, सामंजस्याने मार्ग काढणंच योग्य. प्रत्येक वेळी घटस्फोट हा मार्ग कसा असू शकेल?

जोडीदाराची निवड करताना

- स्वतःला आणि जोडीदाराला एकमेकांच्या गुण दोषांसकट पूर्णपणे समजून घ्या.

- जोडीदाराबद्दल वास्तव आणि तर्कशुद्ध अपेक्षा ठेवा.

- लग्नानंतर बदलणाऱ्या जीवनशैली, नाती, परिस्थितीशी जुळवून घ्यायची तयारी ठेवा.

- लग्नाआधी सेक्स, फॅमिली प्लॅनिंगविषयीचे एकमेकांचे दृष्टिकोन समजावून घ्या. त्यात मुलगा असल्याचा वरचढपणा किंवा अहं शक्यतो नकोच.

- एकमेकांचे छंद, आवडी, सर्जनशीलता यांना प्रोत्साहन द्या.

- हल्लीच्या काळात स्वयंपाक, घरकाम, मुलांचं संगोपन करण्यात पुरुष म्हणून कमीपणा वाटून घेऊ नका. घरात पालकांनी स्वतःच्या मुलांना त्यासाठी पाठिंबा द्यावयास हवा.

- कुटुंबासाठी आर्थिक तरतुदी, बचत यांसारख्या गोष्टींमध्ये बायकोचं मत घ्यायला विसरू नका.

- समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून किंवा विकोपाला जाऊ नयेत म्हणून कोणाशी तरी मनमोकळं बोला.

- स्वतःला काम करणं शक्य नसेल, तर निदान बायकोने केलेल्या कामाचा आदर तरी करा.

Monday, 26 August 2013

इंटरनेट, भारत आणि जग

इंटरनेट जगतात सर्वात जास्त युझर्स हे अमेरिकेचे आहेत. दोन नंबर चीनचा तर तिसरा नंबर भारताचा लागतो.
जपानला मागे टाकून भारतानं तिसरा क्रमांक पटकावला आहे. इंटरनेट जगतातील हालचाली टिपणारी संस्था कॉमस्कोरने ही आकडेवारी दिली आहे.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांचं वय इतर विकसनशील देशांच्या तुलनेत सरासरीने फारच कमी आहे. कॉमस्कोरने आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे.
यात '2013 इंडिया डिजिटल फ्यूचर इन फोकस'ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात घरी आणि ऑफिसात एकूण सात कोटी 39 लाख लोक इंटरनेट वापरतात.

कॉमस्कोरने दिलेल्या रिपोर्टमध्ये मोबाईल आणि टॅबलेट यूझर्सची एकूण संख्या 14 टक्के सांगण्यात आली आहे.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्येत 75 टक्के युझर्सचं वय 35 पेक्षा कमी आहे. भारतात 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे युझर्स आहेत, तर महिलांमध्ये 35 ते 44 च्या वयोगटात सर्वात जास्त महिला इंटरनेट वापरतात.

भारतात इंटरनेट वापरकर्ते जवळपास 25 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्च करतात, एवढाच वेळ ते ई-मेलसाठीही वापरतात.भारतात ब्लॉगर्सची संख्या वाढली असल्याचंही कॉमस्कोरने केलेल्या रिसर्चमध्ये दिसून आलं आहे.

भारतात मागील वर्षभरात ब्लॉगर्सची संख्या 48 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर ब्लॉगिंग साईटवर येणाऱ्या वाचकांची संख्या 3 कोटी 60 लाख झाली आहे.
यातील 26 टक्के युझर्स ब्लॉगिंग साईटवर स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या माध्यमातून येतात. ऑनलाईन व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या भारतात वेगाने वाढतेय.

कॉमस्कोरने दिलेल्या रिपोर्टनुसार मागील वर्षी 40 लाख लोकांनी ऑनलाईन व्हिडीओ पाहिले. मागील रेकॉर्डपेक्षा यात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Tuesday, 9 October 2012

असावा सुंदर चॉक्लेटचा बंगला

असावा सुंदर चॉक्लेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉक्लेटच्या बंगल्याला टॉफीच दार
शेपटीच्या झुपक्यान झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हेलो हेलो करायला छोटासा फोन
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल
चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो
छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

Tuesday, 2 October 2012

जीवनाचा अर्थ

1 . जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

2. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

3. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम !

4. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

5. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

6. मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये.. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

7. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
8. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

9. जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

10. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का ??

कधी तू.....................

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात..

कधी तू…चमचम करणारी चांदण्यात..

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा..

बिजलीची नक्षी अंबरात..

सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात..

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात..

कधी तू…चमचम करणारी चांदण्यात..

कधी तू…अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात..

कधी तू…हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात..

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात..

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा..

बिजलीची नक्षी अंबरात..
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा..
चिंब पावसाची ओली रात..

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात..

कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात....♥ —

ती मुलगी मराठी असते

कंपनीमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमध्ये मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते

मैत्री असते कशी

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की...मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.मैत्री असते कशी, फोडणीसारखी?हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.मैत्री असते कशी, मीठासारखी?हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी........!!!!